ओल्ड फेथफूल.. (मान्सून रंग २)

भारतात दरवर्षी सरासरीच्या ७० ते १२५ टक्के इतका पाऊस पडतोच. त्यातली तफावत हे तर मान्सूनचं स्वातंत्र्य. तो निसर्गाचा भाग आहे, मशीनचं उत्पादन नाही.. ठरवून दिलेल्या मापानुसार बाहेर पडणारं! आता हा चढ-उतारही झेपत नसेल, तर तो आपला दोष. त्याची दूषणं मान्सूनला कशी? – अभिजित घोरपडे

जूनच्या उत्तरार्धात भाताच्या लागणीला वेग आलेला असतो.. सध्या मात्र पावसाची प्रतिक्षा करावी लागत आहे..

जूनच्या उत्तरार्धात भाताच्या लागणीला वेग आलेला असतो.. सध्या मात्र पावसाची प्रतिक्षा करावी लागत आहे..

पाऊस नाही.. अजून नाही.. अजूनही नाही.. महाराष्ट्राच्या बऱ्याचशा भागात गेले काही दिवस तक्रारीचा सूर आहे. आणि तो का नसावा? जून महिन्याचे तीन आठवडे संपलेत. आठ-दहा दिवसांत अख्खा जून संपेल. तरीही पावसाचा जोर नाही. अजून मान्सूनचा पाऊस सक्रिय कसा नाही? कोकण, विदर्भाचा काही भाग सोडला तर महाराष्ट्र कोरडाच आहे. आतापर्यंत पेरण्यांची तयारी झालेली असते. कुठे त्या उरकलेल्या असतात. यंदा चित्र वेगळं आहे. भाताची रोपंसुद्धा नव्यानं वाढवायची वेळ आलीय.

परवाच देहू-आळंदीची वारी सुरू झाली. तिथंही पाऊस लांबल्याचा परिणाम दिसला. इंद्रायणीचा घाट नेहमीइतका भरला नव्हता या वेळी. पश्चिम महाराष्ट्र, मराठवाड्यात तर जूनच्या अखेरपर्यंत वाट पाहावी लागेल. काय होणार तोवर? अनेकांना चिंता लागू राहिलीय. मान्सूनबाबत शंकाही उपस्थित केल्या जात आहेत- अरे, काय लावलंय.. दगा देणार की काय या वर्षी?

तुकाराम महाराजांची पालखी प्रस्थान ठेवते, तेव्हा इंद्रायणीचा घाट वारकर्यानी भरून गेलेला असतो.. यावेळी मात्र असे चित्र पाहायला मिळाले.. (फोटो@राजेश स्टीफन)

तुकाराम महाराजांची पालखी प्रस्थान ठेवते, तेव्हा इंद्रायणीचा घाट वारकर्यानी भरून गेलेला असतो.. यावेळी मात्र असे चित्र पाहायला मिळाले.. (फोटो@राजेश स्टीफन)

मान्सून येईपर्यंत, तो येणार का? आणि आता आल्यावर तो दगा देणार का? असे प्रश्न विचारले जात आहेत.. यातून आपण किती अधिर आहोत, याचं दर्शन होतं. पण मान्सूनबद्दल म्हणाल तर तो विश्वासू आहे.. अगदी ओल्ड फेथपूल!

हे ठामपणे म्हणण्याला कारण आहे. कारण मान्सून आला नाही, असं कधी झालं नाही. कधी होतही नाही. तो येतो म्हणजे येतोच. त्याच्या वाट्याचा पाऊस देतो. मगच जातो.. हेच तर आपल्या मान्सूनचं वैशिष्ट्य. त्याचं येणं पक्कं असतं आणि पाऊस देणंसुद्धा. हा काळही सर्वसाधारपणे ठरलेला असतो. या सर्वच गोष्टींमध्ये थोडं पुढं-मागं होतं, इतकंच. मान्सूनचा भारताकडं येण्याचा प्रवास तब्बल दीड कोटीवर्षांपासून सुरू आहे. हिमालयाची उंची काही कोटी वर्षांपासून वाढतच आहे. अजूनही ही प्रक्रिया सुरू आहे. ती विशिष्ट पातळीपर्यंत वाढली, तेव्हा मान्सूनच्या निर्मितीला गती आली. तेव्हापासून तो (म्हणजेच मोसमी वारे) भारताकडे येतो आहे, सोबत पावसाला आणतो आहे. हा काळ होता- साधारणत: १.५४ कोटी ते १.३९ कोटी वर्षांपूर्वीचा. गोव्यातील राष्ट्रीय सागरविज्ञान संस्था तसेच, ब्रिटनच्या संशोधकांनीपाचेक वर्षांपूर्वी हे दाखवून दिलं. त्याआधी हा काळ ८० लाख वर्षे इतका समजला जात होता.

हिमालयाची उंची विशिष्ट टप्प्यापर्यंत वाढली आणि मान्सूनची निर्मिती झाली...

हिमालयाची उंची विशिष्ट टप्प्यापर्यंत वाढली आणि मान्सूनची निर्मिती झाली…

मान्सूनचं पाणी देण्याचं प्रमाणही ठरलेलं. त्यात चढ-उतारही असतो . संपूर्ण देशाचा विचार केला, तर कमीत कमी सरासरीच्या ७० टक्के आणि जास्तीत जास्त १२५ टक्के ! मान्सूनचा भारतात येण्याचा, पुढं सरकण्याचा काळही असाच. केरळ- १ जून, महाराष्ट्र- ६/७ जून, दिल्ली- १ जुलै, संपूर्ण भारत व्यापणं- १५ जुलै… या सरासरी तारखा. त्यासुद्धा मागं-पुढं होतात. ही तफावत हे तर मान्सूनचं स्वातंत्र्य. तो निसर्गाचा भाग आहे, मशीनचं उत्पादन नव्हे.. ठरवून दिलेल्या मापानुसार बाहेर पडणारं, दरवर्षी एकसारखं! आता हा चढ-उतारही झेपत नसेल, तर तो आपला दोष. त्याची दूषणं मान्सूनला कशी?

खरं सांगू का? अलीकडं आपल्याला सबुरी उरलीच नाही. क्षणभराचा उशीर चालत नाही आम्हाला. कदाचित सर्वच गोष्टी मुळासकट खाण्याची सवय लागल्यामुळे असेल. शिवाय नियोजनाची बोंब. त्यामुळे आम्हाला जराही थांबणं जमतनाही. आता तर त्यात ‘बकासुरी’ माध्यमांची भर पडलीय. त्यांनी आमची थांबण्याचीसवय पार संपवूनच टाकलीय.. पण हे योग्य नाही. जरा इतिहासात डोकवा. निसर्गाच्या सर्वच घटकांमध्ये चढ-उतार आहेत. हे सारं विसरून नुसतंच अधिर बनणं बरं नाही, उपयोगाचंही नाही.. अपयश आपलं अन् पावती मान्सूनच्या नावावर. असं कसं चालेल? त्याच्याइतकी विश्वासार्हता फारच कमी जणांकडं असते. तीसुद्धा दीड कोटी वर्षांपासून. म्हणूनच त्याला म्हणायचं- ओल्ड फेथफूल, कोणी मानो न मानो! – अभिजित घोरपडे ई-मेल : abhighorpade@gmail.com

14 thoughts on “ओल्ड फेथफूल.. (मान्सून रंग २)

 1. Nilesh Ambekar - Thane 98200 32772 says:

  अभिजित मान्सूनचं स्वातंत्र्य, अप्रतिम उपमा दिली आहेस .
  आपण तर हक्कानी ओरबाडायलाच बसलोय आणि मिळाल नाही तर बोंबाबोंब ठरलेली.
  पाउस देतो आणि भरभरून देतो आणि हल्ली आपण म्हणजे तुम्ही- आम्ही जपुन पुरवून वापरण पार विसरून गेलोय.
  म्हणजे असा विचार येतो की पाउस जर आपल्या आप्पलपोटेपणा वर खरच रागावला तर………
  निलेश आंबेकर – ठाणे – 98200 32772

 2. Rajaram L. Kntode says:

  प्रिय अभिजीत घोरपडे,
  हे लेखन म्हणजे कविता वाटते. लयबद्ध लेखनाला माहितीची जोड वाचनाचा आनंद देऊन जाते. पुढच्या भागांची उत्सुकता आहे.

  • प्रिय श्री. राजाराम,
   धन्यवाद..
   पुढचे भाग लवकरच प्रसिद्ध होतील. वाचत राहा.

 3. pundleek d nalawade says:

  त्याचा रागवण्याचा हक्क आहे, तो रागवू शकतो, मागे १९७२ साली रागवला होता. त्याचा अनुभव ज्याना आहे , ते म्हणतील ,मान्सून ने कधीच रागवू नये

 4. Varsha says:

  Sir..we simply can’t imagine our life without “RAIN”. infact it is d heart of this “NATURE”…तो बरसला की आपल्याला अतीव आनंद होतो… तो कोसळला तरी आपण त्यातून सावरण्याचा प्रयत्न करतो… पण त्याने बरसनं ,कोसळनंच बंद केलं तर…?? बापरे …! नको … ती कल्पनासुद्धा नको…

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s