वर्धापन दिन… एका स्वच्छतागृहाचा!

पुण्यात गेल्याच आठवड्यात एका स्वच्छतागृहाचा वर्धापन दिन साजरा झालाआता तुम्ही म्हणाल, पुणंच ते. तिथं विक्षिप्त लोकांचा तोटा आहे का? पण जरा थांबा. संपूर्ण कहाणी वाचा. या विक्षिप्तपणाबद्दल तुमचंही मत बदलेल कदाचित

– अभिजित घोरपडे

हेच ते संजय देशपांडे आणि हीच ती त्यांनी दत्तक घेतलेली मुतारी. स्थळ- नळस्टॉप चौकाजवळ, पुणे.

हेच ते संजय देशपांडे आणि हीच ती त्यांनी दत्तक घेतलेली मुतारी.
स्थळ- नळस्टॉप चौकाजवळ, पुणे.

आपले हे स्वच्छतागृह आमच्या देखरेखीखाली आहे. या विषयी कोणतीही तक्रार असल्यास ९५५२५०१७१८ / ९९२२४४६९९६ या मोबईल क्रमांकांवर संपर्क साधावासंजीवनी ग्रुप.”

कधी पुण्यात गेलात तर ही पाटी जरूर वाचा. ही पाटी आहे एका सार्वजनिक मुतारीवर. हे आत्ता सांगायचं निमित्त म्हणजेगेल्याच आठवड्यात या मुतारीचा / स्वच्छतागृहाचा वर्धापन दिन साजरा झाला. आता तुम्ही म्हणाल, पुणंच ते. तिथं पुणेरी पाट्या आणि विक्षिप्त लोकांचा तोटा आहे का? पण जरा थांबा. संपूर्ण कहाणी वाचा. या विक्षिप्तपणाबद्दल तुमचं मत बदलेल कदाचित.

संजय देशपांडे.. एक भयंकर उत्साही माणूस. कधीही फोन केला की उत्तर येतं, ”बोल दादा…” बोलण्यात तोच उत्साह.

मुतारीची आधीची अवस्था बरी नव्हती...

मुतारीची आधीची अवस्था बरी नव्हती…

व्यवसायानं बिल्डर. तरीही तुमच्यामाझ्यासारखा, सामान्य माणसासारखा वागणारा. तसाच वाटणारा. संजीवनी डेव्हलपर्स नावाने पुण्यात व्यवसाय करतो.

या माणसाला नळस्टॉप चौकाजवळची एक गोष्ट खटकायची. त्या रस्त्यानं जाताना दुर्गंधी यायची. कारण होतं, तिथं असलेली सार्वजनिक मुतारी. एक तर मुतारी आणि तीसुद्धा सार्वजनिक.. मग आणखी काय असणार? जाणारेयेणारेसुद्धा नाक धरून जायचे. जवळपास व्यवसाय करणाऱ्यांनाही ती नकोशी झाली होती. पण करणार काय?

देशपांडे यांनी वेगळा विचार केला. रोजच नाक धरून जाण्यापेक्षा आणि नाकं मुरडण्यापेक्षा ती मुतारीच दत्तक घ्यायचं ठरवलं. कोणी वेड्यात काढावं, अशीच ही कल्पना. पण त्यांनी वेडेपणा केला. आपल्या कल्पनेचा पाठपुरावा केला. बऱ्याच खटपटी केल्या. स्थानिक नेतेकार्यकर्त्यांची मदत घेतली. कशासाठी?… तर मुतारी दत्तक घ्यायला महापालिकेची परवानगी मिळवण्यासाठी. परवानगी मिळाली. लगोलग पाणीदिवे यांची व्यवस्था केली. सुशोभिकरण केलं. कडेला रोपं लावली. कुंड्या आणून ठेवल्या. मुतारीची स्वच्छता आणि सारी व्यवस्था पाहण्यासाठी एक माणूसही नेमला. साहजिकच मुतारीचं रूप पालटलं. दुर्गंधी गेली.. ते उपयोगाचं ठिकाण ठरलं.

आता या मुतारीचं रूप पूर्ण पालटलंय...

आता या मुतारीचं रूप पूर्ण पालटलंय…

बघता बघता वर्ष उलटलं. गेल्याच आठवड्यात, २८ जानेवारीला या उपक्रमाचा पहिला वर्धापन दिन साजरा झाला. हे निमित्त साधून पुण्याचे महापौर दत्ता धनकवडे, खासदार वंदना चव्हाण, इतर नेते मंडळी, परिसरातले लोक एकत्र आले. उपक्रमाचं कौतुक झालं.. असं झालं पाहिजे, हा विचार मांडून कार्यक्रमही संपला. एकच मुद्दा उरलापुढं काय?

खरं तर देशपांडे यांनी ही मुतारी दत्तक घेतली, तेव्हा आतासारखं स्वच्छ भारतचं वारं नव्हतं. ”स्वच्छ पुणे सुंदर पुणेही घोषणा ऐकून ऐकून सपक बनली होती. त्या काळात यांनी हे पाऊल उचललं. ते पाहून वाटलं होतं, इतरही लोक यात उतरतील. पण तसं झालं नाही. हे फार खर्चिक आहे का? तसंही नाही. देशपांडे यांच्याशी बोलल्यावर त्यांनी हिशेब सांगितला… ”सगळं धरून वर्षाला एक लाख चाळीस हजार. महिन्याला मॅक्स बारा हजार. आमच्या बिल्डर मंडळींसाठी तर अगदीच किरकोळ. एकेक पार्टी देतात, त्यावर पाचपन्नास लाख उडवतात..” या उपक्रमात देशपांडेसुद्धा फायद्यात आहेत. समाधान तर मिळालंच. प्रसिद्धी मिळाली. नावही झालं. नावावर गुडविल जमा झालं ते वेगळंच!

आतापर्यंत दोन बिल्डरांनी असं करण्याची तयारी दाखवली असल्याचं देशपांडे यानी सांगितलं.

फक्त बिल्डरच कशाला? व्यापारी आहेत, इतर व्यावसायिक, उद्योजक, संस्था, संघटना, विविध क्लब, राजकीय पक्षकाय हरकत आहे पुढं यायला? उद्योगांनी कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी (सीएसआर) म्हणून कुठंही पैसे घालवण्याऐवजी हा मार्ग जास्त चांगला.

एका स्वच्छतागृहाचा वर्धापन दिन साजरा झाला... - हे पुण्यातच घडू शकतं !

एका स्वच्छतागृहाचा वर्धापन दिन साजरा झाला…
– हे पुण्यातच घडू शकतं !

सार्वजनिक व्यवस्था उत्तम ठेवण्याची जबाबदारी स्थानिक स्वराज्य संस्थांची. या संस्था बळकट झाल्या तर उत्तमच. पण तोवर अव्यवस्थेबद्दल नुसतीच नाकं मुरडायची का? आपणही एक पाऊल पुढं टाकायला हवं. जबाबदारी घ्यायला हवी.

पंतप्रधानांनी स्वच्छ भारतची हाक दिलीच आहे. त्याला प्रतिसाद म्हणून हातात झाडू घेणाऱ्यांची संख्या कमी नाही. पण ते आतासारखं एक दिवसापुरतं नाटक ठरू नये. त्यातून कायमस्वरूपी काही घडलं तर ते फलदायी ठरेल. देशपांडे यांनी यापैकी एक मार्ग दाखवलाच आहे. ज्यांना शक्य आहे त्यांनी तो जरूर चोखाळावा.. समाधाननावप्रसिद्धीगुडविल एकाच वेळी आणि इतक्या कमी खर्चात मिळवण्याचा कदाचित दुसरा मार्ग नसेल!

अभिजित घोरपडे

मेल : abhighorpade@gmail.com

39 thoughts on “वर्धापन दिन… एका स्वच्छतागृहाचा!

  1. Yogesh Nandurkar says:

    Abhijit its really adorable… Hats off to Sanjay Deahpande and you also. Sanjay is leading by example and you put focus on such a great happening, event.
    I would like to act on my CSR, its lighted in me this example…

    • Dear Shree. Nandurkar,

      Thank you.
      Liked our response.

      Yes, there are many genuine ways to act on CSR like working towards Cleanliness, Environment, Education, etc.

      Happy to get your prompt response.

      Regards.

  2. Ravindra Gore says:

    – this effort is laudable no doubt.
    – but this can not be a system for doing it on mass scale.
    – sulabh international of mr pathak is a better model while large scale
    implementation.
    – there can be a good feature on this subject that may guide one and all
    .
    – maintenance of urinals and toilets is a complex issue.
    – charged toilets/wash places is a solution but may not be accepted by
    all
    – PPP MODEL needs to be developed in this area
    – waterless toilets like aircrafts and dinanath are possible
    – rly s is planning waterless toilets
    – space is another big issue
    – nobody wants toilet close to his/her property
    – developement plans shd provide places at regular intervals
    – DP does not even provide for local bus stops in the plan, therefore
    bus drivers hv no choice than to hold it on road that jams the traffic.

    ​am ready to offer my service free of cost in planning or the way u like.
    thx​

    ravi gore
    9011061961

  3. Sayali S Jagtap says:

    Hello Abhi Sir,
    The efforts by Mr.Deshpande – Appreciated.
    However people like us should definately suggest this as an CSR Activity to others.
    Yes. I m agree without any high advertisement these things are possible, Need is selfmotivation.
    Thank You for Sharing.

  4. sanjay deshpande says:

    dear da, thanks aton for this as what better tribute i can have! i will be happy if all the public toilets will be adopted as then i will say we can really call them public toilets as whats public but us only?

  5. खूप छान उदाहरण मांडले आहे तुम्ही. हे उदाहरण अनेक लोकाना follow करण्यासारखे आहे.CSR activity म्हणून तर सहज च करता येण्यासारखे आहे. अशा चांगल्या कामाची ओळख करून दिल्याबद्दल मनापासून धन्यवाद!

  6. अरे वा! वाचून एकदम सुखद वाटले.तुमच्या मुळे संजय देशपांडेंच्या ब्लॊगचा ही परिचय झाला. चेतन पंडितांनी मनोगतवर दिलेल्या लिंक मुळे मी इथे आलो. अशीच सामाजिक जाणीव तेवत राहिली पाहिजे.

  7. देवदत्त पाटणकर says:

    संजय देशपांडेंचा प्रयोग उत्तमच आहे. परंतु अशाने समस्येच संपूर्ण उत्तर मिळते असे वाटत नाही,कारण हा प्रयोग म्हणजे समांतर व्यवस्था उभी करणे आहे. आहे ती व्यवस्था( असल्यास ) पूर्ण गुणवत्तेने कशी चालवता येईल हे पाहणे जास्त जरुरीचे वाटते. महापालिका किंवा स्थानीक स्वराज्य संस्था यांचा कारभार हा पुर्णपणे नागरिकांनी भरलेल्या करामधून चालत असल्याने अशा सर्व सेवा त्यांनी वेळेवर व गुणवत्तापूर्ण देणे अनिवार्य आहे. सध्याच्या परिस्थीतीमध्ये अशा संस्थांना हलवून कामे करून घेणे हे सामान्य नागरिकांसाठी फारच जिकीरीचे होते. असे प्रयत्न नागरिकांचे दबाव गट प्रभाग पातळीवर तयार झाल्यास नक्की यशस्वी होतात असा माझा स्वत: चा अनुभव आहे.हे सर्व जरी असले तरी अशा वेगळ्या प्रयत्नांना दाद द्यायलाच हवी. प्रसिद्धी दिल्याबद्धल आपले अभिनंदन.

    • खरंय देवदत्त…
      मी लेखाच्या शेवटी हा मुद्दा मांडलाय.. पण सार्वजनिक व्यवस्था सुधारत नाहीत, तोवर नाकं मुरडण्यापेक्षा असं काहीतरी हवं.. इतकंच.

    • sanjay deshpande says:

      indeed PMC & Govt is there & they will be doing their bit , but then we as an individual also has some responsibility towards the city & the society, isnt it?.. sanjay deshpande

  8. Sunil Nawale says:

    अभिदा,
    लई भारी ! पुण्यात आलो कि तिथेच ….ला जाणार .

  9. अभिदा, अरे एका महत्त्वाच्या विषयावर काम करणाऱ्या माणसाचा परिचय करून दिल्याबद्दल आभारी आहे. सरकार म्हणजे शेवटी आपण सारे ना? छान वाटले वाचून. वेडे लोकं वाढत जावोत…

  10. महेश खळदकर says:

    अभिजीत अतिशय सुंदर ,छान ,वाचनीय ,अप्रतिम लिहिले आहेत आपण.
    कोणत्या ना कोणत्या गोष्टीने समाजात बदल होतोय हे स्तुत्यच आहे .
    काळाची गरज आहे की सध्या समाजात अनेक लोक समाजउपयोगी जे काही करत आहेत त्याची पब्लिसिटी झाल्या शिवाय इतर झोपलेले लोक जागे होत नाहीत निदान ह्या गोष्टी मुळे काहीतरी समाज सुधारणा करण्यास इतर लोक प्रवृत्त होतात किंबहुना मदतच हो
    शेवटी पुणे तेथे काय उणे .

    • धन्यवाद महेश… खूप काही चांगले घडते आहे. आपल्या परीने लोकांपर्यंत पोहोचवू या.

  11. एक चांगला उपक्रम लोकांपर्यंत पोहचवल्याबद्दल तुमचंही अभिनंदन. प्रत्येक खासदाराने गाव दत्तक ेण्यापेक्षा नगरसेवक, आमदार, खासदार यांनी आपल्या परिसरातील (अ)स्वच्छतागृहे दत्तक घेतली तरी भारत स्वच्छ होईल. आणि मुख्य म्हणजे ही स्वच्छतागृहे अस्वच्छ करणा-यांना (थुंकी बहाद्दरांना, कचरा टाकणा-यांना) तिथेच चांगला दंड करायला हवा. दुसरा भाग म्हणजे, मुबलक स्वच्छतागृहे उभारण्याचीही गरज आहे. मुंबीत तर आहेच आहे.

  12. Mrs Alka Kolipakam says:

    Thanks for giving publicity to the good work of Mr Sanjay Deshpande and congratulations to Mr Deshpande. Surely this can be a very good idea for CSR which is now a legal requirement for certain business organisations. It can be a win-win situation for all if more such projects can be undertaken. Suggestions by Mr Ravindra Gore and Mr Devdatta Patankar are also very worthy, as they can provide an alternate solution to this issue. Different people/corporates may like to take such alternate routes, so I found their contribution to be good inputs.

    • sanjay deshpande says:

      thanks a lot, all I think is if the city has given me some success & stability, I too need to give something to the city back… sanjay

Leave a reply to sarika wadekar Cancel reply