पाण्यामुळं प्रजननक्षमता हरवली (उजनीच्या पाण्याचं दुष्टचक्र)

पुणे, पिंपरी-चिचंवड या मोठ्या शहरांचं घाणेरडं पाणी नदीवाटे वाहतं. ते जमा होतं, भीमा नदीवर असलेल्या उजनी धरणात. या दूषित पाण्याचे अनेक परिणाम आतापर्यंत माहीत आहेतच.. पण याच पाण्यामुळं जनावरांची प्रजननक्षमता घटली, अशी लोकांची तक्रार आहे. पशुवैद्यकही त्यात तथ्य असल्याचं सांगतात. नेमकी काय समस्या आहे ही?

– अभिजित घोरपडे

हो.. हे आहे उजनी धरणाचं पाणी. हे पाहिल्यावर त्याच्या प्रदूषणाबद्दल वेगळं सांगायची गरज आहे का??

हो.. हे आहे उजनी धरणाचं पाणी.
हे पाहिल्यावर त्याच्या प्रदूषणाबद्दल वेगळं सांगायची गरज आहे का??

अहो, जनावरांना आता गाभ राहत नाही. राहिला तरी अचानक गर्भपात होतो. पूर्वी जनावरं वेत झाल्यानंतर पुन्हा तीन महिन्यांत गाभण राहायची. आता वर्ष झालं तरी त्यांना गाभ राहत नाही. गेल्या चारपाच वर्षांमध्ये हे जाणवू लागलंय…”

माढा तालुक्यात फुटजवळगाव नावाचं गाव आहे. तिथले शेतकरी संजय हांडे सांगत होते.

पुणे आणि सोलापूर जिल्ह्यांच्या सीमेवर आहे उजनी धरण. त्याच्या पाण्याची अवस्था पाहण्यासाठी आम्ही फिरत होतो. महाराष्ट्र विकास केंद्र या संस्थेचे संस्थापक आणि पाण्याच्या क्षेत्रातील अभ्यासू कार्यकर्ते अनिल पाटील सोबत होते. सकाळपासून बरीच ठिकाणं पाहून झाली होती. दुपारच्या वेळी हांडे यांच्याकडे गेलो. धरणाच्या जलाशयाला लागूनच त्यांचं गाव. घाणेरडा वास सुटला होता. जलाशय जवळ असल्याचा तो पुरावा होता. हांडे यांच्या घरात गेलो. समोर पाण्याचा ग्लास आला.

पाणी फिल्टरचंय ..” त्यांनी आवर्जून सांगितलं.

पाठोपाठ दुधाचा कप आला. हांडे सांगू लागले

जनावरांना गाभ धरत नाही. आधी वाटायचं चाऱ्यात वेगळं काही येतंय का? तसं काही नव्हतं. मग जनावरं बदलली. तरी तीच कथा. शेवटी जनावरं दुसऱ्या गावाला, बार्शीला पाठवली. तिथं ती वेळेत गाभण राहू लागली. तेव्हा लक्षात आलं, दोष पाण्यामध्ये आहे. उजनीच्या दूषित पाण्यामुळंच हे होतंय…”

हांडे उजनी धरणाच्या काठचे. त्यांना उजनी धरणाचंच पाणी वापरावं लागतं. या पाण्यामुळे जनावरांची प्रजननक्षमताच धोक्यात आलीय, असं ते सांगत होते. त्यांच्या म्हणण्यावर पटकन् विश्वास बसत नव्हता. पण ते नाकारताही येत नव्हतं. कारण ते स्वत:चा अनुभव सांगत होते. त्यामुळे कोणाचा विश्वास बसतो की नाही, याला फारसा अर्थच नव्हता.

हांडे सर्वसामान्य शेतकरी नाहीत. ते प्रगत, सधन शेतकरी आहेत . उत्कृष्ठ गोपालकसुद्धा! त्यांनी पशुपालनामध्ये अनेक प्रयोग केले आहेत. त्यांना विविध व्यासपीठांवर आदर्श पशुपालक म्हणून गौरवण्यात आलं आहे. त्यामुळे ते सांगत असलेली माहिती महत्त्वाची होती.

फूटजवळगाव... उजनीच्या पाणवठ्यालगतचं गाव. इथं अनेक समस्या भेडसावतात.

फूटजवळगाव… उजनीच्या पाणवठ्यालगतचं गाव. इथं अनेक समस्या भेडसावतात.

त्यांचा अनुभव बरंच काही सांगणारा होता. ६ वर्षांपूर्वी त्यांना शंका आली, पाण्यामुळे जनावरं गाभण राहत नाहीत. शंका आल्यावर तीन संकरित गायी बार्शीला पाठवल्या. तिथं त्या नियमित गाभण राहू लागल्या. पाठोपाठ त्यांनी इतर गायी, खोंडंही तिकडं पाठवून दिली.

उजनीचं पाणी दूषित आहेच. या पाण्यावर उगवलेल्या गवतालासुद्धा वास येतो. जनावरं पाण्याला तोंड लावत नाहीत. त्यांना पाजायला दुसरं पाणीच नसतं. शेवटी तीपण सवय करून घेतात. या पाण्यामुळे जनावरांच्या दुधाला वास येतो…” हांडे उजनीच्या पाण्याची कहाणी सांगत होतं.

स्वाभाविकपणे माझी कपातल्या दुधाकडं नजर गेली.

त्यावर ते म्हणाले, “साखर घालून वास घालवावा लागतो.”

इतकंच नाही. या भागात पूर्वी मोठ्या संख्येनंफुलपाखरं, काजवे दिसायचे. ते आता दिसेनासे झालेतइतर अनेक विषयांवर चर्चा झाली. त्यांचा संबंधही दूषित पाण्याशी जोडला जात होता.

हांडे यांची निरीक्षणं थेट होती. त्यांच्या माहितीकडं दुर्लक्ष करणं शक्य नव्हतं. तरीही दूषित पाण्याचा जनावरांच्या प्रजननक्षमतेवर परिणाम होत असेल, हे म्हणणं पटत नव्हतं. त्यामुळे इतर गावातील लोकांचे अनुभव ऐकायचं ठरवलं. त्याच भागात पटवर्धनकुरोली गावात अशीच समस्या ऐकायला मिळाली. या गावचे तात्या चंदनकर यांचाही तसाच अनुभव. ते शेळी फार्म चालवतात. त्यांना शेळ्यांच्या माध्यमातून ही समस्या भेडसावते. तेसुद्धा दूषित पाण्याकडंच बोट दाखवतात.

हे पाणी शुद्ध करण्याचा पर्याय उपलब्ध आहे. माणसांना पिण्यापुरतं ते शुद्ध करणं जमेल. पण जनावरांसाठी या पाण्याची चैन कशी परवडेल?” चंदनकर प्रश्न करतात. त्याचे परिणाम भोगावे लागतात. शेळ्यांच्या वेतामध्येही अंतर पडू लागलंय. गर्भपात होऊ लागले आहेतपरिसरातील शेतकरी, जनावरं पाळणाऱ्यांची पाण्याबद्दल तक्रार आहे.

भीमा उजनी धरण...

भीमा उजनी धरण…

”हो, दूषित पाण्याचाच संबंध!”

या भागातील पशुवैद्यकही या समस्येशी पाण्याचा संबंध जोडतात. त्या भागातील पशुवैद्यक उपासे स्पष्ट करतात

जनावरं दूषित पाणी पिवोत, नाहीतर अशा पाण्याच्या संपर्कात असोत, परिणाम होतोच. नराची शुक्रनिर्मिती आणि मादीची स्त्रीबीजनिर्मिती यांच्यावर विपरित परिणाम होतो. गाभ राहण्यातही अडथळे येतात. दुसरं असं की, दूषित पाण्यामुळं जनावरांमध्ये हगवण, अपचन, पोटाचे वेगवेगळे रोग वाढतात. या विकारांमुळं त्यांना सतत कुंथावं लागतं. त्यामुळे गर्भपात होण्याची शक्यता वाढते. अलीकडे उजनीच्या परिसरात ही समस्या वाढल्याचं दिसतं.”… पशुवैद्यकानंच हे सांगितल्यामुळं परिस्थितीचं गांभीर्य वाढत होतं.

उजनीच्या प्रदूषणामुळे माणसाच्या आरोग्यावर परिणाम होतात. हगवण, त्वचेचे विकार, कावीळ, इतर संसर्ग हे नेहमीचंच. दूषित पाणी अन् भूजलामुळं मुतखड्याचे रुग्ण जास्त आहेत. काही गावांमध्ये तर घरटी ही समस्या भेडसावतेपण जनावरांच्या प्रजननक्षमतेवर परिणाम होत असेल, तर समस्येची तीव्रता वाढते. जनावरांसाठी पाणी तरी कुठून आणणार? पूर्वी विहिरीचं पाणी वापरण्याचा पर्याय होता. आता तोसुद्धा राहिला नाही. कारण सर्वच भागात उजनीचं दूषित पाणी पोहोचलंय. वेगवेगळ्या पिकांच्या निमित्ताने ते पसरलं. आता भूजलसुद्धा प्रदूषित झालंय. उजनीच्या परिसरात, पुढं भीमा नदीद्वारे हेच पाणी वापरलं जातं. या पट्ट्यात ऊस, इतर बागायती पिकं आहेत. उजनीचं दूषित पाणी सर्वत्र फिरलं आहे, पाझरलं आहे, खोलवर मुरलं आहेत्यामुळे या पाण्यापासून लवकर मुक्तीही शक्य नाही.

– अभिजित घोरपडे

ई मेल : abhighorpade@gmail.com

12 thoughts on “पाण्यामुळं प्रजननक्षमता हरवली (उजनीच्या पाण्याचं दुष्टचक्र)

 1. Ajay says:

  सर गोष्ट खरोखरच धक्कादायक आहे पण सर्वे थोडा मोठा केला असता तर सरकारला दखल घेण्याजोगि गोष्ट जाली असती

  • होय अजय…
   पुढच्या काळात याबाबत सविस्तर सर्वेक्षण आणि अभ्यास करण्याचा मानस आहे. त्याद्वारे अनेक गोष्टी स्पष्ट होतील. त्या विविध व्यासपीठांवर मांडता येतील.
   आपल्या प्रतिसादाबद्दल धन्यवाद.

 2. देवदत्त पाटणकर says:

  पुणे शहराचं untreated मैलापाणी जे आपण पुण्यनगरीवासी निर्लज्यपणे नदीत सोडतो आहोत त्याचे हे दुष्परिणाम आहेत. याला आपल्या महान ‘महा’पालिकेबरोबर सर्व पक्षीय माननीय , नेते व सर्वात महत्वाचे पण सर्वात दुर्लक्षीत असे नागरिक जबाबदार आहेत. एका बाजूला smart city च्या वल्गना करताना अशा basic गोष्टींबाबत आपण अक्षम्य हेळसांड करतो. कचर्‍याबाबत आज हीच परिस्थीती आहे. आपला कचरा आपण दुसर्‍याच्या दारात वर्षाला 100 कोटी रुपये खर्च करून ( फक्त उचलण्याचा खर्च ) नेऊन टाकतो. त्या गावकर्‍यांनी आंदोलन करण्याची वाट पहातो. आता त्यांनी बंदी केल्यावर काशी गाळण उडाली आहे ते सर्वांना माहीतच आहे.
  जलस्त्रोत व इतर ठिकाणी प्लास्टीक च्या होणार्‍या प्रदूषणापासून वाचण्यासाठी गेली 4 वर्षे Responsible Recycle India Foundation, The Achademic Advisors , Kothrud Citizens Forum व इतर अनेक संस्थांमार्फत आम्ही पुण्यातील शाळामध्ये ‘ सागरमित्र ‘ हा उपक्रम राबवत आहोत. या मध्ये शाळकरी विद्यार्थी घरात जमणारे सर्व प्रकारचे ( स्वच्छ व कोरडे ) प्लास्टीक महिनाभर गोळाकरतात व ठरलेल्या दिवशी शाळेत आणून देतात. आमचे Recyclers शाळेत जाऊन असे प्लास्टीक रु 8 प्रती किलो दराने विकत घेऊन Recycling साठी नेतात. आजच्या घडीला पुण्यातील सुमारे 60000 विद्यार्थी हे बहुमोल काम करत आहेत. मागील वर्षी सुमारे 13 टन प्लास्टीक या प्रकारे इथे – तिथे न पडता Recycling system मध्ये दिले गेले.

 3. Sandeep Parkhe says:

  अभिजीत सर तुमचा हा लेख खरोखरच भीषण सत्य आहे. माझे गांव खेड ,तालुका कर्जत हे पण ऊजनी परिसरांत व भिमा नदिच्या किनारी आहे . माझ्या गावांत तुम्ही लिहलेल्या सर्व समस्या सेम आहेत पिण्याच्या पाण्याच्या विहरी पण प्रदूषीत झाल्या असून अत्यंत घाणेरडा वांस ह्या पाण्याला येतो. गावांत पाण्यामुळे होणारे आपण वर्णण केलेले सर्व रोग आहेतच . पण आपण केलेली प्रजननाची समस्या हि गंभीर असून मी याबाबत जरुर पाहणी गावांतील जबाबदार नागरीकांना करावयांस सांगेन माझ्यासाठी फार महत्वपूर्ण लेख धन्यवाद .

 4. All the Tree blogs about Ujani needs to be seroiusly taken care for. Need to creat a group named SAVE BHIMA/UJANI. Puneites should come forward to rectify the self-created bad situation.

 5. Mrs Alka Kolipakam says:

  Very informative article. It has helped people from other villages to identify the cause of foul-smelling water. Also very impressed by the efforts of Shree Devdatta Patankar for collecting recyclable waste from schools

 6. Adv. Deshmukh P P says:

  It’s very useful to implement to the wastage of water. and i hope that, the programmer for saving of water be arrange by the social media as a mission. by all of us.

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s