भोली सूरत दिलके झुटे…

फळं, भाज्या आपण रोज खातो, पण त्यांच्या पोटात काय दडलंय याची कल्पना असते का आपल्याला? रासायनिक खतं, कीटकनाशकं, संजीवकं यामुळे त्यांचा कस तर गेलाच, आता तर ती आरोग्याच्या दृष्टिने हानीकारक बनली आहेत. याबाबत काही काळजी नक्कीच घेता येते. ती घ्यायलासुद्धा हवी. नाहीतर हा कीटकनाशकांचा राक्षस कधी शरीराचा ताबा घेईल सांगता येत नाही. आणि हो, तोवर वेळही निघून गेलेली असेल. म्हणूनच आकर्षक चकचकीत फळांचं वर्णन करावं लागतं- भोली सूरत दिलके झुटे…!

– अभिजित घोरपडे

भोली सूरत दिलके झुटे...? नुसता रंग आणि चमक याला भुलून चालणार नाही. कस आहे का हे पाहावे लागेल.

भोली सूरत दिलके झुटे…?
नुसता रंग आणि चमक याला भुलून चालणार नाही. कस आहे का हे पाहावे लागेल.

कलिंगड. माझ्या आवडत्या फळापैकी एक. लाल, रसरशित, उन्हाळ्यात शरीराची पाण्याची गरज भागवणारं. चवीला उत्तम. आकार आणि रंगसंगतीसुद्धा आकर्षक. म्हणूनच कापलेलं लालबुंद कलिंगड पाहिलं की खायची इच्छा व्हायची.. पण आता तसं होत नाही. मनात पहिली शंका येतेकाय, कसं असेल?

गेल्याच आठवड्यातला किस्सा. कलिंगड आणलं. दुपारी कापलं. त्याच दिवशी संपवायचं म्हटलं, तरीही थोडंसं राहिलंच. फ्रीजमध्ये ठेवलं. दुसऱ्या दिवशी काढलं, तर खराब झालं होतं. वास येत होता. मग कृष्णाने सांगितलेलं वर्णन आठवलं. कृष्णा म्हणजे श्रीकृष्ण कोल्हे. माझा लोकसत्तामधला सहकारी. मूळचा उस्मानाबाद जिल्ह्यातला. कळंब तालुक्यात हावरगाववाकडी हे त्याचं गाव. त्याच्या गावानं या वर्षी भरपूर कलिंगडं केली. जवळजवळ शंभर एकरावर कलिंगडाचं पिक होतं. शेतकऱ्यांना उत्पन्नही चांगलं मिळालं. पण पीक घेताना ज्या प्रमाणात औषधं फवारली जातात, ते विचार करायला लावणारं होतं. कलिंगड साधारणत: ८०८५ दिवसांचं पीक. त्याला दर दोन दिवसाआड कसली ना कसली फवारणी, खतं असायची. पीक काढायच्या चारपाच दिवस आधी एक औषध फवारलं जातं, फळाला आतून लाल रंग येण्यासाठीकृष्णा सांगत होता.

कलिंगड आतून लालबुंद पण...

कलिंगड
आतून लालबुंद पण…

औषधांचा एवढा मारा होत असेल तर त्या फळात काय कस राहत असेल? कस जाऊ द्या.. शरीराला काही अपाय तर होत नसेल ना? माझ्या मनात स्वाभाविकपणे शंका आली. त्यातच घरी आणलेलं कलिंगड खराब झालं. या दोन गोष्टींचा संबंध असेलनसेल, पण तो नकळत जोडला गेला. आता फळं पूर्वीसारखी निर्धोकपणे खाता येत नाहीत. द्राक्ष्यावर होणाऱ्या फवारण्यांचं ऐकतो, आंबा पिकवण्यासाठीच्या कॅल्शियम कार्बाइड पावडरचं ऐकतो, वेगवेगळया फळांच्या वाढीसाठी वापरल्या जाणाऱ्या संजीवकांचं ऐकतो, भाज्या टवटवीत दिसाव्यात म्हणून काही व्यापारी/ विक्रेते त्या कीटकनाशकांमधून बुडवून काढत असल्याचं ऐकतो, भाज्यागाजरं आकर्षक दिसावीत म्हणून ती वेगवेगळ्या रंगातून बुडवून काढत असल्याचं ऐकतोत्यामुळे आपल्या पोटात जातं ते कसं असतं, याची शंका येते. धास्ती वाटते.

हिरव्या भाजीमध्ये काय दडलंय... सांगता येईल का?

हिरव्या भाजीमध्ये काय दडलंय… सांगता येईल का?

गेल्या काही वर्षांत आपल्याकडं फळंभाज्या पिकवण्याच्या पद्धती कमालीच्या बदलल्या. नवं तंत्रज्ञान आलं, नवं संशोधन झालं तसे कीडनित्रंणाचे, रोग रोखण्याचे, उत्पादनवाढीचे काही मार्ग अवलंबले गेले. पण त्यात नेमकेपणा आला नाही. काय फवारायचं, किती फवारायचं, कसं फवारायचं.. याबाबत अजूनही पुरेशी जागरुकता नाही. त्यामुळे कळत न कळत काही चुकीच्या गोष्टीसुद्धा वाढत गेल्या. त्याचबरोबर ग्राहकांच्या दृष्टीही बदलली. फळाची, भाजीची चव कशी आहे यापेक्षा ते दिसायला कसं आहे, त्याचा आकार कसा आहे हेच जास्त पाहिलं जाऊ लागलं. मग साहजिकच उत्पादकानेही त्या गोष्टीकडं जास्त लक्ष दिलं. गोडी, कस, पोषणमूल्यं याला दुय्यम स्थान आलं.. याचासुद्धा हा परिणाम.

सीताफळ घेताय?... चिंता नको, खुशाल घ्या.

सीताफळ घेताय?… चिंता नको, खुशाल घ्या.

स्ट्रॉबेरी घेताय?... काळजीपूर्वक घ्या.

स्ट्रॉबेरी घेताय?… काळजीपूर्वक घ्या.

 

 

 

 

 

आता बाजारातून फळंभाज्या घेताना काय घ्यावं हे ठरवणं खरंच कठीण आहे, पण ढोबळमानानं काही गोष्टी पाहता येतात. ज्यावर मुळातच कमी प्रमाणात कीटकनाशकं, संजीवकं फवारली जातात ती फळ खाणं कमी धोक्याचं. काही फळांमध्ये त्यांच्या जाड सालीमुळं, तिच्या विविध थरांमुळं औषधांचे अंश आतपर्यंत जात नाही. अशी फळंही बरी. काही तज्ज्ञांशी बोलून अशा बऱ्या फळांची यादी केली. त्यात बोर, पेरू, गावोगावीचे रायवळ आंबे, अंजीर, सीताफळ, चिक्कू, डाळिंब, संत्री, मोसंबी, जांभूळ, पपई, खरबूज यांचा समावेश होतो. याबाबतीत द्राक्षं, स्ट्रॉबेरी, हापूससारखा आंबा घेताना काळजी घ्यायची गरज असते.

सफरचंद घेताय? शक्यतो देशी पाहा.. बाहेरचं कधीचं आहे, कसलं आहे.. कोणाला ठाऊक? उगाच विषाची परीक्षा...

सफरचंद घेताय?
शक्यतो देशी पाहा.. बाहेरचं कधीचं आहे, कसलं आहे.. कोणाला ठाऊक? उगाच विषाची परीक्षा…

ढोबळमानाने आणखी एक काळजी घ्यावी ती परदेशातून येणाऱ्या फळांबाबत. आपल्याकडं बाहेरून येणाऱ्या मालाच्या दर्जाबाबत तपासणी व्यवस्थित होत नाही. त्यामुळे येणारा माल किती दिवसांचा आहे, त्याचा दर्जा काय आहे याबाबत आपण अंधारातच असतो. अनेक देशसुद्धा त्यांनी साठवून ठेवलेला माल जेव्हा कधी खपवायचा असेल, तेव्हा भारतासारख्या विकसनशील आणि गरीब देशांकडे पाठवतात. हा माल दिसतो छान, पण त्याच्या दर्जाची खात्री अजिबातच देता येत नाही. आपल्याकडं देशोदेशीची सफरचंद येतात. ती आकारामुळे, रंगामुळे, चकाकीमुळं, त्यावर लावलेल्या लेबलमुळे लक्ष वेधून घेतात.. पण त्यांचं सारंच दृष्टिआड असतं. त्यामुळे तुलनेनं आपली हिमाचलची, काश्मीरची सफरचंद खाल्लेली बरी. सफरचंद व इतर काही फळं टिकण्यासाठी आणि आकर्षक दिसण्यासाठी त्यांना चक्क वॅक्सिंग केलं जातं. त्यासाठी वापरले जाणारे काही पदार्थ खाण्यासाठी योग्य असतात, तसं प्रमाणपत्रही दिलं जातं. पण जे वापरंल जातं ते कसलं असतं हे कोण आणि कसं ओळखणार? याबाबतीत केवळ व्यवस्थांवर विसंबून राहणं योग्य ठरणार नाही. भाज्यांबाबतही असंच.

या सगळ्यातून घ्यायचं काय? भाजी निवडणं सोपं काम नाही.ते कौशल्य आहे, ती एक कला आहे...

या सगळ्यातून घ्यायचं काय?
भाजी निवडणं सोपं काम नाही.ते कौशल्य आहे, ती एक कला आहे…

खरेदी करताना चांगली भाजी निवडणं ही कला आहे. चांगलं निवडण्यासाठी नजर लागते. लहानपणीचं अजूनही आठवतंय. भाजी आणताना काय आणायचं याच्या घरून सूचना असायच्यालेकुरवाळीलालकोराची केथी, कुस असलेली गवार, काटे असलेली लहान वांगीएखादी पालेभाजी घेताना देठ खुडून पाहायला जायचा. शेंग सोलून पाहिली जायची. मटकीचे चार दाणे तोंडात टाकले जायचे. आता हे अभावानंच दिसतं. मग रंगात बुडवून हिरव्या केलेल्या भाज्या, लाल रंगवलेली गाजरं कळणार कशी? आपण नेहमीच खात असलेल्या पालेभाज्या, कोबी, फ्लॉवर, भेंडी, टोमॅटो यांच्याबाबत जास्तीची काळजी घेणं आवश्यक ठरतं. कारण यांच्यावर बुरशी वाढू नये म्हणून अनेक विक्रेते त्या कीटकनाशकात बुडवून काढतात. अशा भाज्या चारआठ दिवस व्यवस्थित टिकतात आणि चकचकीतही दिसतात. खायला मात्र घातक. यासाठी पुन्हा दोन गोष्टीदिसण्यावर भुलण्यापेक्षा चव पाहणं आणि नेहमीच्या भरवशाच्या विक्रेत्यांकडून भाजी खरेदी करणं.

एवढं करूनही घरात येणारी फळं, भाज्यांची खात्री देता येतेच असं नाही. मग जाता जाता एक उपाय. भाज्याफळं स्वच्छ वाहत्या पाण्यात धुवावी. शक्य असतील ती काही वेळ भिजत ठेवून मग धुवावी. विशेषत: द्राक्ष्यासारखी फळं काही तास मिठाच्या पाण्यात भिजत ठेवावी. मग धुवून खावीहे सारं शरीरावर होणारा अपाय कमी करण्यासाठी. पण मुळातच कसदार आणि चविष्ट खायचं असेल तर या फवारण्या, रासायनिक खतं, संजीवकं यांच्याशिवाय पिकवलेलं खावं लागेल. त्यासाठी आता जैविक पद्धतीनं उगवली जाणारी फळ, भाज्या यांचा पर्याय उपलब्ध आहे. हळूहळू त्याचं प्रमाणही वाढतंय.. त्या तुलनेनं महाग आहेत, पण त्रासदायक खाऊन आजारी पडण्यापेक्षा ते नक्कीच परवडतं.

(हा लेख लिहण्यासाठी माझे मित्र अॅग्रोवनचे वृत्तसंपादक आनंद गाडे आणि उपमुख्य उपसंपादक मंदार मुंडले यांच्याशी केलेल्या चर्चेचा उपयोग झाला.)

अभिजित घोरपडे

(abhighorpade@gmail.com)

(हे झालं रासायनिक खतं, कीटकनाशकं, संजीवकं व इतर पद्धतींमुळं. हे थांबवणं आपल्या हातात तरी आहे. याच्या पलीकडं एक गोष्ट आहे ती बदलणं लगेच तरी आपल्या हाताबाहेरचं आहे. ती म्हणजे प्रदूषित पाणी. या पाण्याद्वारे फळं, भाज्या व खाण्याच्या इतर उत्पादनांमध्ये अनेक घातक खनिजं मिसळली जात आहेत. ती सर्वांत त्रासदायक आहेत. कर्करोगाला आमंत्रण देणारी आणि किडनीचे जीवघेणे रोग वाढवणारी आहेत. या चक्रव्यूहाबाबत पुढच्या भागात…)

11 thoughts on “भोली सूरत दिलके झुटे…

  1. Shri Abheejitji,if you access the statistics from pesticide residue analysis lab situated at Krishibhavan,Shivajinagar,Pune 5 you will get the exact scenario.No of samples analyses and samples with non permissible limits of pesticides will reflect the grave situation we are facing.Aggressive awareness campaign is needed for Food Safety Standers.Unless demand is created for Safe Food,farmer will continue to adopt same practices. And need to overcome the consumer perception that Safe is costly.

  2. Sunil Nawale says:

    अभिदा,
    अरे राजा आजच दुपारी लालबुंद कलिंगड खाल्लंय. वाचून पोटात माल्मालायला होतंय.

  3. ARJUN B. MASKE says:

    khup upukt mahiti delit sir….shetkari vargat yachi jagruti vhayla havi…ani ashi sheti karnarya shetkaryala veshesh puraskar ani subcidy denyat yavi…jenekarun shetkaryacha utsaha vadhel ani etar shetrkari sudha tyatun bodh ghetil…….once again thank u sir

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s