एक बादली गरम पाण्यासाठी…

एका होस्टेलमध्ये मुक्कामी होतो. उठल्यावर गरम पाण्याचा नळ सुरू केला. बादली भरली तरी गरम पाणी येईना. मग तिथल्या कर्मचाऱ्याला बोलावलं. त्यानं मोठ्या प्रेशरनं नळ सोडला. जवळजवळ सातआठ बादल्या पाणी वाहून गेलं.. मग तो पाण्याच्या धारेखाली हात धरून बोलला, “साहेब, आलं बरं का गरम पाणी!” मी कपाळावर हात मारला. म्हटलं,कुठून याला सांगितलं. हा तर रोगापेक्षा इलाज भयंकर..”

गरम पाण्याच्या एका बादलीसाठी इतकं पाणी वाया जातं. सर्वच ठिकाणचा हा अनुभव.. माझा. तसाच इतरांचाही असेल. काय करता येईल का यावर?

– अभिजित घोरपडे

कितीतरी बादल्या गार पाणी वाया जातं.. तेव्हा कुठं गरम पाणी मिळतं.

कितीतरी बादल्या गार पाणी वाया जातं.. तेव्हा कुठं गरम पाणी मिळतं.

गरम पाणी मिळणार नाही वाटतं इथं?..” मी मनाशी पुटपुटलो. पाठोपाठ इंटरकॉमवर फोन लावला.

पलीकडून त्या होस्टेलचा कर्मचारी बोलला,साहेब, जरा वेळ नळ सुरू ठेवा. सुरूवातीचं पाणी वाहून गेलं की आपोआप गरम पाणी येईल..” त्याने मलाच अक्कल शिकवली. जानेवारी महिना होता. चांगलाच गारठा होता. वेळही भल्या सकाळची.. त्या कर्मचाऱ्याची आज्ञा पाळून नळ सोडला, बादली गार पाण्याने भरली, तरी गरम पाण्याचा पत्ता नव्हता. पाणी वाहू देण्याचं मन होईना. मग त्या कर्मचाऱ्यालाच बोलावून घेतलं.

तो झपझप आला. लग्गेच प्रश्न सोडवतोअशा आविर्भावात माझ्याकडे पाहिलं आणि बाथरूममध्ये गेला. त्याने मोठ्या प्रेशरनं नळ सोडला. जवळजवळ आठदहा मिनिटं नळ वाहत होता. माझ्या डोक्यात वाहणाऱ्या पाण्याचा हिशेब सुरू झाला. साधारण सातआठ बादल्या पाणी वाहून गेलं असावं..

एक बादली गरम पाणी मिळावं म्हणून वाया जणाऱ्या पाण्याचा हिशेब मोठा आहे...

एक बादली गरम पाणी मिळावं म्हणून वाया जणाऱ्या पाण्याचा हिशेब मोठा आहे…

आलं बरं का गरम पाणी!” त्या कर्मचाऱ्याच्या बोलण्याने माझी तंद्री भंगली. वाहत्या नळाच्या धारेखाली हात धरून त्याने गरम पाणी आल्याचं पुन्हा एकदा सांगितलं. मी कपाळवर हात मारला. मनात म्हटलं, कुठून याला सांगितलं. हा तर रोगापेक्षा इलाज भयंकर..”

जानेवारी महिन्यात खान्देशात व्याख्यानासाठी गेलो होतो. त्या वेळी तिथल्या एका प्रसिद्ध गेस्ट हाऊसवर उतरलो होतो. तिथली ही गोष्ट. तिथं पाण्याचा विचार केला जातो. तरीसुद्धा ही अवस्था, मग इतर ठिकाणची काय गत? त्याच दिवशी कार्यक्रमानिमित्त जळगाव जिल्ह्यात भुसावळला जावं लागलं. तिथं एका हॉटेलात उतरलो. गावाच्या मानानं मध्यम आकाराचं हॉटेल. तिथंसुद्धा असंच उत्तर.. “दोन बादल्या गार पाणी वाहून जाऊ द्या. आपोआप गरम पाणी येईल..” गरम पाण्याच्या एका बादलीसाठी इतकं पाणी वाया घालवावं लागतं.

हे असं सगळीकडंच चालतं. हे होस्टेल की ते हॉटेल किंवा हे गाव की ते शहर.. एवढाच तपशिलाचा फरक. बाकी पाणी वाहू देणं हा सगळीकडचा सारखाच प्रश्न! लहान गावंनगरं तर आलीच, मुंबईदिल्लीसारख्या महानगरातही हेच चालतं. पाण्याची किंमत कुठंच केली जात नाही. एकदा हरियाणातील मानेसर या ठिकाणी एका कार्यशाळेसाठी गेलो होतो. हेरिटेझ, वगैरे नावाचं उत्तम रीसॉर्ट होतं. तिथल्या कर्मचाऱ्यानं तर गरम पाण्यासाठी इतकं पाणी वाहू दिलं की त्यात एखाद्याची महिन्याभर अंघोळ झाली असती. तेवढं करूनही पाणी आलंच नाही, शेवटी बादलीतूनच गरम पाणी आणून दिलं.

पाणी गरम करण्यासाठी अनेक ठिकाणी मध्यवर्ती यंत्रणा असते.. तेथून पाणी खोलीपर्यंत पोहोचेपर्यंत बरंचसं गार पाणी वाहून द्यावं लागतं..

पाणी गरम करण्यासाठी अनेक ठिकाणी मध्यवर्ती यंत्रणा असते.. तेथून पाणी खोलीपर्यंत पोहोचेपर्यंत बरंचसं गार पाणी वाहून द्यावं लागतं..

माझी नेहमीची तक्रार असतेगरम पाणी हवं, तर ते लगेच का येत नाही. त्याच्यासाठी दोनतीन बादल्या तरी पाणी का वाहू द्यावं लागतं?.. त्याचं अजून तरी समाधानकारक उत्तर मिळालेलं नाही. काही जण त्याचा दोष पाणी गरम करण्याच्या मध्यवर्ती व्यवस्थेला देतात. हॉटेलमधील मध्यवर्ती ठिकाणावरून गरम पाणी इतरत्र पोहोचतं. त्यामुळे सुरूवातीला बरंचसं गार पाणी सोडून द्यावं लागतं. हीच व्यवस्था प्रत्येक खोलीत असेल तर कदाचित असं होणार नाही, फारसं पाणी वाया जाणार नाही. मध्यवर्ती यंत्रणेतही पाणी वाहून नेणाऱ्या पाईपला चांगल्या दर्जाचं उष्णतारोधक आवरण (इन्सुलेशन) असेल तरीही पाणी वाचू शकेल. अर्थातच हॉटेल व्यावसायिक खर्च आणि सोय पाहून याबाबत निर्णय घेत असतील. त्यात या वाहून जाणाऱ्या पाण्याचं मोल दुय्यम ठरत असावं. खरं काय ते त्यांनाच ठाऊक.

पाण्याच्या पाईपला चांगले उष्णतारोधक आवरण असेल तर गरम पाणी लवकर येण्यास मदत होते..

पाण्याच्या पाईपला चांगले उष्णतारोधक आवरण असेल तर गरम पाणी लवकर येण्यास मदत होते..

लहानमोठी काळजी घेतली तरी बरंचसं पाणी वाचवणं शक्य होतं. अनेक ठिकाणं अशी आहेत, तिथं गरम पाण्याचा नळ कुठला आणि गार पाण्याचा कुठला? हे समजतच नाही. एकतर त्यावर तशी स्पष्ट खूण नसते, ती निघून गेलेली असते किंवा समजण्याजोगी नसते. काही ठिकाणी अशी खूण असते, पण चुकवलेली! त्यामुळे काही समजायच्या आत चारसहा बादल्या पाणी वाया जातं.. हे हॉटेलच्या प्रत्येक खोलीचं आणि तेसुद्धा रोजचं. वाहून जाणाऱ्या पाण्याचा नेमका आकडा सांगता येणार नाही, पण हिशेब केला तर तो मोठा असणार हे निश्चित!

आता तर हे हॉटेलपुरतं राहिलेलं नाही. मोठ्या सोसायट्यांमध्येही सकाळी गरम पाणी येण्यासाठी आधी काही बादल्या पाणी सोडून दिलं जातं.. हे तर आणखीच गंभीर. कारण हे पाणी वापरणाऱ्यांची संख्या जास्त. शिवाय घरगुती वापराच्या पाण्याला फारसे पैसे मोजावे लागत नाहीत. त्यामुळे वाहून जाणाऱ्या पाण्याकडं लक्ष दिलं जातंच असं नाही.

फार थोड्या हॉटेलमध्ये गरम व गार पाण्याबाबत सूचना स्पष्टपणे लावलेल्या असतात..

फार थोड्या हॉटेलमध्ये गरम व गार पाण्याबाबत सूचना स्पष्टपणे लावलेल्या असतात..

बरं, हे सोडावं लागणारं पाणी तसंच वाहून द्यायचं का? घडीभर असं गृहित धरू की सुरुवातीचं काही पाणी सोडावं लागेल.. पण मग हे पाणी कुठंतरी साठवण्याची व्यवस्था करा की. यात बरंच काही करणं शक्य आहे. फक्त तसं करायची इच्छा हवी. अगदी साधा उपाय म्हणजे बाथरूममध्ये एक पाईप द्या. सुरूवातीचं गार पाणी येईपर्यंत तो नळाला जोडायला सांगा. ते पाणी पाईपद्वारे एकत्रित जमा करण्याची व्यवस्था ठेवा. ते पाणी तसंच्या तसं पुन्हा वापरता येईल.. आणखीही काही मार्ग काढता येईल का? आपण विज्ञान, तंत्रज्ञानातल्या प्रगतीच्या गोष्टी सांगतो. मग तंत्रज्ञान वापरून इथं काही उपाय केला जाईल का?

बऱ्याचदा होतं असं, बहुतांश जणांची पाणी वाचवण्याची इच्छा असते, पण पर्यायच उपलब्ध नसतो. वाईट वाटतंच. मोठ्या प्रमाणावर पाणीही वाया जातं. या सर्व समस्यांची उत्तरं आहेत. नक्की आहेत. फक्त ती शोधण्याची प्रामाणिक इच्छा असायला हवी.. खरं तर यावर वैयक्तिक शिस्त गरजेची आहे. ती नसेल तर शेवटी नियमन करण्याची वेळ येईल. ते करावंच लागेल.. कारण पाण्याला मोल आहे, दिवसेंदिवस ते वाढतच जाणार आहे!

अभिजित घोरपडे

मेल : abhighorpade@gmail.com

27 thoughts on “एक बादली गरम पाण्यासाठी…

 1. prakash says:

  khup chan lekh. This is a common & practical issue. We don’t even realise we wasting recourses. Thanks for making us aware. Solution to resolve this concern is also very easy & nice.

 2. हेमांगी says:

  संपूर्ण सहमत, माझासुद्धा तोच अनुभव, तीच तगमग. एखाद्या व्यक्तीच्या हातात उपाय नसून तो व्यवस्थेच्या हातात आहे असे मला वाटते. हॉटेल मालकाला किंवा पोऱ्याला बोलण्याव्यतिरिक्त मी आजपर्यंत काहीच करू शकलेले नाही.

  • खरंय हेमांगी…
   हा अनेकांचा अनुभव असतो. चिडचिड करूनही काही उपयोग नसतो. उपाय व्यवस्थेत हातात आहे. मात्र, त्यासाठी आपण बोलायला हवे.. आग्रह धरायला हवा.

 3. Prof R R Kelkar says:

  अभिजीत, लेख चांगला आहे. पण माझा अनुभव आहे की, प्रस्तुत समस्या फक्त लहान हॉटेल किंवा विश्राम गृहापुरती मर्यादित आहे. मोठ्या हॉटेलमध्ये गरम पाणी नळात नेहमीच खेळते ठेवलेले असते आणि हॉट नळ उघडला की,.लगेच गरम पाणी मिळते. जेथे अशी समस्या असेल तेथे १-२ रिकाम्या बादल्या ठेवल्याने तिचे सहज निरसन ङोईल.
  ह्यावर दुसरा सोपा उपाय म्हणजे नेहमी थंड पाण्याने स्नान करण्याची सवय करणे. उत्तर भारतातले लोक उन्हाळ्यात कधीही गरम पाण्याने आंघोळ करत नाहीत. मराठी माणसाला मात्र बारा महिनेे गरम पाणी का लागावे हे मला समजलेले नाही. आपण जर मार्च ते मे ह्या तीन महिन्यांत थंड पाण्याने आंघोळ केली तर पाणी वाचेल आणि ऊर्जाही वाचेल.

  • सर…
   माझा अनुभव वेगळा आहे.
   दिल्ली-मुंबईतील तारांकित हॉटेल्समध्येसुद्धा मी हा अनुभव घेतला आहे. मानेसर येथील अतिशय आलिशान रीसॉर्टमधील अनुभव मी दिलाच आहे. आणि अशा उंची हॉटेलमध्ये आता “बादली आणि मग” नसतातच.
   .
   मराठी लोकही उन्हाळ्यात थंड पाण्याने अंघोळ करतात सर. मीसुद्धा त्यातला एक आहे. पण जानेवारीत कडाक्याच्या थंडीत अगदी सकाळी मला ते शक्य झाले नाही… तरीही प्रयत्न नक्की करेन.
   .
   प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद.

 4. Sayali says:

  One of my friends says that you can use your own body heat to heat up your body (which means exercise) and then take a bath with cold water. 🙂

 5. Ajinkya says:

  Please take advice of Mr. Vithhal Kamat or Engineers of Orchid Hotel in Mumbai. His (Orchid) hotel is environment friendly / ecofriendly. Orchid has been awarded many prices for saving environment. Ask them whether they are also having the same problems? what designs they have created to stop these issues coming in your mind. you will get the solution.

 6. Ajinkya Bedekar says:

  I am completely agree with Pro R R Kelkar’s statement. Only small hotels have this problem. Other wise if you take a bath at 9.00 a.m in these hotels, you will get Hot water when you open a tap. Since early morning few people getup and take a bath, this causes little water circulation inside plubming system. Hence you get cold water at early morning.

 7. Surekha Sule says:

  Big hotels invest in heavy insulated pipes.
  At home, we have connected the solar heater pipeline to old electrical heater which collects water. As a result we don’t need to waste cold water.
  Others can also have some such container in each room.

 8. shubhada says:

  Abhijit, I fully agree. I have experienced this in many places all over India- North, South, East, West.. in any good hotel this problem I have faced. Also I faced similar problem Malaysia and in Geneva, Switzerland.

 9. Anuradha Kodilkar says:

  All your articles are eye opener. Now a days in many bathrooms taps are varied and pipe can not fit on those taps. Especially those taps where there is mixer. These taps r provided by the builders. So don’t know what is the solution for this.

  • Yes.. there are problems. But we’ll have to find ways.
   You fill buckets with cold water and use it through out the day.. or something like that.
   Thanks for your reaction.
   Regards.

 10. Girish Abhyankar says:

  Wastage is compulsory in every technological solution; more complicated the technology, more is the wastage. We end up in more matter and/or energy wastage in most solutions to such situations.
  The scientific reason for this is explained in my book “WRONG Theory” I presented to U.

  Girish

 11. Kalpana says:

  अगदी बरोबर. प्रश्न असा आहे कि हे माहीत असूनही कोणी काही करत नाही किंवा करू शकत नाही. सतत ह्या बद्दल hammering पेपर मधून, सर्व माध्यमातून, शिक्षणातून झाले तर बदल होऊ शकेल. काय करता येईल, काय करणे शक्य आहे आणि ते कसे करावे ह्यावर आपण सर्वांनी लक्ष्य केंद्रित करणे गरजेचे आहे, असे वाटते.
  कल्पना

 12. Mrs Alka Kolipakam says:

  It is very distressing to know about the huge wastage of water. In our private homes we can do something if we are conscious, in some way similar to that suggested by Surekha Sule. If Housing societies have a system of collecting the waste water from bathrooms and kitchen sinks and recycle it, to some extent this wastage can be salvaged. As regards the hotels, it can be only said that they are giving lip-service to Eco-construction and perhaps more checks by government should be in place for compliance.

 13. Dhananjay Shantaram Kulkarni says:

  Hi Abhijeet,
  Nice article on wastage of water in common heating system.
  We have a solution for that called BLEED OFF SYSTEM. Its like remove the cold water from the pipe so you can get hot water immediately as soon as you open the tap. Pipes should be properly insulated. Once the pipe is heated no loss of temperature. It is manual as wall as auto also. But apart from all this Awareness Is Most Important.
  Keep it up Abhijeet. Proud of you. I am also working in Solar & Water treatment. Trying to provide ECO solutions to people. Lets do it.
  Thanks N Regards,
  Dhananjay

 14. सौरभ says:

  सर hotels काय माझ्या घरी सुद्धा हच प्रॉब्लम होता . तुमचा ब्लॉग वाचला आणि बाथरूम मधे ठळक अक्षरात लिहिले आहे ” सुरुवातीला आलेले थंड पाणी लाल बादलीत काढून ठेवणे , कृपया सांडू नये”. तेच पाणी इतर कामासाठी आता वापरात येते . धन्यवाद मार्गदर्शन केल्याबद्दल .

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s